अविनाश सर नमस्कार ..मी सोनू मांडे अर्जुन चे बाबा .काल आम्ही अर्जुन ला न्यायला आलो होतो .वेळेअभावी भावना प्रत्यक्ष व्यक्त करू शकलो नाही म्हणून या माध्यमाद्वारे बोलत आहे .
सर ,आजच्या या धकाधकीच्या जीवनात आम्ही खरे जगणं विसरून गेलो आहे त्यामुळे आमचे मुलं सुद्धा ..आपण नेमका धागा पकडून आमच्या मुलांना जीवन डोळस पणे जगण्याची दृष्टी दिली .जे आम्ही आमचे करियर घडवताना खूप उशीरा शिकलो ते स्टेज देअरिन्ग ,संवाद कौशल्य ,आस्था ,जाणीव ,उत्तुंग स्वप्न पाहण्याची दृष्टी,निसर्गावर प्रेम कसे करावे,जगात किती दुःख आहे आणि आपण किती सुखी आहोत ही जाणीव ,आपले आई वडील आपल्यां साठी किती करतात हे समजाऊन सांगणे ,एक ना अनेक प्रकारे आपण मुलांच्या मनात spark रुजवला ,त्यांना 2042 च्या निमित्ताने भविष्याचे स्वप्न पाहण्यास शिकवले .काळ पासून अर्जुन च्या तोंडून अनुभव ऐकतांना गेल्या 7दिवसात तो खऱ्या अर्थाने जीवन जगलाय असं वाटतंय .
आपले व आपल्यां संपूर्ण टीम चे मनःपूर्वक खूप खूप आभार आणि आपल्यां प्रयास संस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा ..
धन्यवाद 🙏🙏
Sonu Mande, Gondia (Parent)
आनंदाचे झाड मनात रुजवणारे अजोळ: प्रयास सेवांकुर प्रणित SPARK उन्हाळी शिबिर
आजोळ म्हटले की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना उन्हाळ्याची सुटी आठवते. उन्हाळ्याच्या सुटीत आईसोबत मामाकडे आजोळी जाणे म्हणजे वर्षभर केलेल्या कामांचा श्रमपरिहार असायचा. सर्व बच्चे कच्चे मिळून सुट्टीत धमाल करायचे. शाळेचे टेंशन नाही, की नवीन काही शिकण्याचे प्रेशर नाही. पण तरीही ती सुटी खूप काही शिकवून जायची. सकाळी उठून गावाबाहेर केलेला मॉर्निंग वॉक, भर उन्हात झाडाच्या सावलीत रंगलेला कुठलाही खेळ, एकमेकांशी केलेली भांडण, सोबत जेवण आणि रात्री गच्चीत झोपून मारलेल्या भरपूर गप्पा. अशा छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला अमाप आनंद देऊन जायच्या. आजोळी घालवलेले ते काही दिवस मनात आनंदाचे झाड ठेऊन जायचे.
काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. छोटी कुटुंबे, व्यस्त जीवनपद्धती, सभोवताली काँक्रिट चे जंगल यामुळे उन्हाळ्याची सुटी AC रूम्स मध्ये टीव्ही समोर बसून, मॉल्स मध्ये खरेदी करून, गेम झोन्स ला भेटी देऊन, रात्री चे जेवण हॉटेल मध्ये करून साजरी होऊ लागली. आणि आनंद मिळायला पैसा लागतो, ही आमच्या मुलांची धारणा पक्की होऊ लागली.
प्रयास सेवांकुर चे रहिवाशी उन्हाळी शिबिराची माहिती वाचत असताना ज्या गोष्टीने मला सगळ्यात जास्त आकर्षित केले, ती गोष्ट होती, "मुलांना लहान लहान गोष्टीतून आनंद घ्यायला शिकवणे." विशेष म्हणजे हे सात दिवसांचे रहिवासी शिबिर होते. मुलाला रहिवासी शिबिरात सोडायचे म्हणजे आई म्हणून मी मनाची बरीच तयारी करून गेले होते. अर्णव रडला तर त्याला काय समजावयाचे, मला रडू आले तर स्वतःला कसे थांबवायचे या गोष्टीचा बराच सराव मी मनात करून ठेवला होता. पण शिबिराच्या पहिल्या दिवशी पालक बालक संवाद एवढा छान झाला, की अर्णव ला सोडतांना ना अर्णव रडला, ना मला मला गहिवरून आले. शिबिरात मुलांना मोबाईल आणि पैसे द्यायचे नव्हते. "फारच अडचण आली तर आम्ही तुम्हाला फोन करू, आमचा फोन आला नाही म्हणजे तुमचं बाळ सुखरूप आहे असे समजा," हा विश्वास शिबिराचे मार्गदर्शक डॉ अविनाश सावजी सरांनी पालकांना दिला. आणि त्या दिवसापासून सुरू झाला मुलांचा आनंदाचा प्रवास. आम्ही पालक व्हॉट्सॲप ग्रुपवरून या आनंद यात्रेचे प्रेक्षक झालो. या सात दिवसात काय केले नाही मुलांनी? पहाटे पाच ला उठले, योगा केला, अनोळखी परिसरात जाऊन पुस्तके विकली, फळे विकली, अनोळखी फेरीवाल्यांना जाऊन भेटले, त्यांचेशी गप्पा मारल्या, त्यांची सुख दुःखे जाणून घेतली. शहरातल्या विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोंडेश्र्वर ची टेकडी चढून गेले (पायरीने नव्हे), बांबू गार्डन ला गेले, छत्री तलाव फिरले, वृद्धाश्रमात जाऊन आले, गोरक्षण संस्थेला भेट दिली, वडाच्या झाडाच्या परब्यांवर झोके घेतले, पडले, धडपडले पण पुन्हा उठून उभे राहिले. मारामाऱ्या केल्या, खोड्या काढल्या, आणि शिबिराच्या शेवटच्या दिवशी एकमेकांच्या गळ्यात पडून रडले सुद्धा. या सात दिवसात मुलांना ना मोबाईल ची आठवण आली, ना AC ची गरज पडली. उन्ह लागले नाही आणि आइस्क्रीम पण आठवले नाही. आपण आजोळी जाऊन जसे स्वच्छंद बागडायचो, तशी मुले या शिबिरात बागडली. माझा मुलगा या शिबिरात काय शिकला मुलगा असे जर कोणी विचारले तर मी सांगेन, "तो आयुष्य जगायला शिकला." अर्थात सात दिवसाच्या या "SPARK" शिबिराने फक्त माझ्या मुलाच्याच नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मनात आनंदी राहण्याचा SPARK निर्माण केला आहे. बघुया ही धग आम्ही कोठवर कायम ठेऊ शकू.
I am very glad to share with you all that my daughter Aabha recently participated in the spark 2022 summer camp arranged by Prayas sevankur institution of Respected Dr. Avinash Saoji sir. It was very amazing to find out that she lived without any contact with me for seven days and most important without any gadgets and within minimum facilities and resources. Now she has realized that life can be beautiful without advance gadgets and without junk food.
She woke up everyday at 5 am and doing every personal and household chores. Went to visit various places and participate in various activities which she had never done before like selling of books, fruits, interviewing govt. officers and so on. Most importantly she connected with nature. Made lots of friends.
For all of this I would like to express my gratitude to respected Dr. Avinash Saoji sir and PRAYAS team who taught a crucial lesson to my daughter that, you don't need only money to be happy in life.This I saw on the face of Aabha which I had never seen before.
So I would recommend to all to send your kids to this camp for real life experience which we cannot buy from money.
Adv. Ranjita Madiwale-Vaidya, Amravati (Parent)
I wonder what kind of magic PRAYAS SPARK 2022 did on me ?? I'm overwhelmed by my change 😃..i used to be lazyy , who's routine was literally be like disgusting..who always spent a lot of time on screen and do unnecessary works ..who did not like to interact a lot ..who was very shy to be confident..who was always afraid of new people's..who was afraid to explore new world.........but!!! When I stepped in prayas i was curious of being alone there , being introvert , being teased on my personality , but within a days our sir put a spec of "2042" at that day I was being very excited to explore new world and that's how my change begin...at that day I was completely mixed in my friends and was completely extrovert:) at that time I was feeling enthusiastic and energetic of being capable to talk to new people's and mixed up with them ...from that day till now I'm completely a upgraded version of "Myself" alllll thanks to sir who gave me an amazing spec to look on and thanks to my lovely friends who always treated me like a kid 😂 and taught me so many routine things..also thanks to bharti mam who was being a spectacular "Mom".. also thanks to shachi didi , rajashree mam , prajakta mam who taught us to be confident every single time....Now in my house I'm a being through an amazing life..and I'm happy about my routine and my doing's ..My parents are much happier and overwhelmed than me cause of prayas!! Thank you so much prayas for your mesmerizing magic by which I'm living a "Wonderful New Life"😊